सातारा वनविभागाच्या भरारी पथकाने मेढा मार्गावर धडक कारवाई करून अवैध खैर लाकूड वाहतूक करणारा महिंद्रा पिकअप जप्त केला. रात्री उशिरा डांगरेघर येथे रचलेल्या सापळ्यातून ही कारवाई करण्यात आली. पिकअपमधून कात तयार करण्यासाठी वापरला जाणारा खैर प्रजातीचा लाकूडमाल सापडला असून तो परवानगीशिवाय वाहतूक होत असल्याचे उघड झाले आहे.