साताऱ्यात कोयत्याच्या धाकाने मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सकाळी मॉर्निंग वॉक करायला जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमाने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र कोयत्याचा धाक दाखवून हिसकावले. यामुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे मात्र यामुळे पोलिसांचा धाक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.