सोलापूर शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने धडक मोर्चा काढून निवेदन देण्यात आले आहे. तरीपण सध्याच्या काळात शहरात विविध धार्मिक सामाजिक, सांस्कृतिक तसेच खासगी कार्यक्रमांमध्ये डी. जे. चा वापर बंद होणे अपेक्षित होते. परतु दिवसेंदिवस डीजेच्या वापरात वाढ झाली आहे. सोलापूर शहर व जिल्हा प्रशासनाने डी. जे. व लेसर मुक्त करून त्याची जनतेसमोर जाहीर मांडणी करावी अशी मागणी केली आहे.