गणेशोत्सव व ईद सणानिमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी राजवाडा येथे पोलिसांचा सराव, दंगा नियंत्रण प्रात्यक्षिक व सातारा शहरातून पथ संंचलन करण्यात आले. पोलीस जवानांनी राजवाडा बसस्थानक परिसरात मॉक ड्रिल केले. यावेळी घोषणा देत आलेल्या आंदोलनकर्त्यांवर अश्रू धुरांचा मारा करून त्यांना पसरवण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, पोलीस व जवान उपस्थित होते.