बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकरच्या कारला मुंबईतील सिटीफ्लो बसने धडक दिली. या अपघातात गाडीला मागच्या बाजूस मोठे नुकसान झाले; मात्र सुदैवाने कोणतीही जखम झाली नाही. शिल्पा शिरोडकर यांनी या घटनेनंतर बस कंपनीच्या निष्काळजीपणाबद्दल संताप व्यक्त केला आणि पोलिसांच्या मदतीबद्दल आभार मानले.