शेकडो वर्षांनंतर पहिल्यांदाच श्रीकृष्ण जन्मोत्सव दोन दिवस साजरा करण्याचा योग आला आहे. यंदा पंचांगातील गणनेनुसार जन्माष्टमी १५ आणि १६ ऑगस्टला साजरी होत असून, वृंदावनात सकाळी तर महाराष्ट्रात मध्यरात्री हा उत्सव साजरा केला जात आहे. बीडसह संपूर्ण जगात किर्तन-भजन, पूजा-अर्चा आणि भाविकांच्या उपस्थितीत श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होत आहे.