शेतकरी संघटनेने राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर प्रांत कार्यालयासमोर आज एक अनोखे आणि लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी संपुर्ण कर्जमाफी आणि गो-हत्याबंदी कायद्यातून विदेशी वळू-भाकड जनावरे वगळण्याच्या मागणीसाठी करत शेतकऱ्यांनी आपली भाकड जनावरे आणि नवजात गोऱ्हे घेऊन प्रांत कार्यालयावर समोर आंदोलन केलं.