ऐन पोळा सणाच्या दिवशीच गडचिरोली जिल्ह्यातून एक दुःखद घटना समोर आली आहे.पोळा सणानिमित्त सुट्ट्या घेऊन शाळेतून घरी आलेल्या ६ वर्षीय बालक गावालगत असलेल्या नाल्यात वाहून गेल्याची घटना भामरागड तालुक्यात उघडकीस आली आहे. रिशान प्रकाश पुंगाटी असे त्याचे नाव आहे. दरम्यान आज सकाळी त्याचा मृतदेह कोयर येथील नाल्यात आढळून आला आहे. (रिपोर्टर )