ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर “अडाणी” असा शब्द वापरून केलेल्या टीकेला मराठा समाजाकडून तीव्र विरोध होत आहे. माळशिरस तालुक्यात झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत “हाकेला सांगा आता कुठ जायचे मुंबईला जायचे” अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच “हाके तु शिकलेला पण समाजाला विकलेला” अशा शब्दांत हाके यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.