सोलापूर : सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातल्या चार जणांचा दुदैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून पूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी (31 ऑगस्ट) रोजी सोलापूर जिल्ह्यातील नळ बाजार चौक येथील बलरामवाले परिवारात घरगुती गॅसची गळती झाल्यामुळे परिवारातील माणसं बेशुद्ध झाली होती. ही घटना शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी संपूर्ण कुटुंबाला खासगी रुग्णालयात दाखल केले, परंतु बलरामवाले परिवारातील लहान चिमुकल्यांना डॉक्टकरांनी मृत घोषित केले तर कुटुंबातील दोन स्त्रियांची तब्येत नाजुक होती आणि एक पुरुष बेशुद्ध पडला होता.
सोलापूरमध्ये बाजार चौकात राहत असलेल्या बलरामवाले परिवारावर काळाने घाला घातला. रात्री झोपताना गॅस गळती झाल्याने एका कुटुंबातील पाच जण बेशुद्ध पडले होते तर त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे ही पोलिसांनी सांगितले. दुपारपर्यंत बलरामवाले घराचा दरवाजा बंद दिसल्यामुळे शेजाऱ्यांनी घरी जाऊन बघितले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. तेव्हा तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्या कुटुंबातील दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. तर घरातील दोन स्त्रियाची प्रकृती नाजुक होती आणि घरातला कर्ता पुरुष बेशुद्ध होता.
सुरुवातीला त्या चिमुकल्यांचा दुदैवी मृत्यू झाला, त्यांनतर उपचार सुरु असताना आजीनेही अखेरचा श्वास घेतला. उपचार सुरु असताना आजीची प्राणज्योत मालवली. त्या तिघांच्या मृत्यदेहावर शोकाकुल वातावरणात भावपूर्ण अंत्यसंस्कार होत असताना त्या चिमुकल्यांच्या आईनेही जगाचा निरोप घेतल्याने बलरामवाले कुटुंबातल्या मृतांचा आकडा चार वर गेला आहे. त्यामुळे त्यांच्या परिवारात आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घरगुती गॅस गळतीमुळे सोलापूरमधील पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. सुखी कुटुंबाला कोणाची नजर लागली आणि होत्याच नव्हतं झालं असं प्रत्येक सोलापूरकर म्हणतं आहे. गॅस गळती दुर्घटनेतील मृत चिमुकल्या आणि आजीच्या चितेला अग्नी देत असतानाच चिमुकल्यांच्या आईचादेखील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शरीरात वाढलेले कार्बन मोनॉक्साईडमुळे ऑक्सिजनची पातळी संपूर्णपणे नष्ट होऊन श्वसन प्रक्रिया बंद पडल्याने आजीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावेळी उपस्थित बलरामवाले नातेवाईक आणि बांधवांनी एकच हंबरडा फोडला.
बलरामवाले कुटुंबातील एक व्यक्ती म्हणजे त्या चिमुकल्यांचे वडील शासकीय रुग्णालयात असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले मात्र या घटनेचा धसका घेतल्याने अधूनमधून अस्थिर होत असतात म्हणून त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात येत असल्याचे ही त्यांनी सांगितले.
– प्रीती हिंगणे (लेखिका)