कोलंबो : महिला क्रिकेट विश्वचषकातील सहावा सामना भारत आणि पाकिस्तान महिला क्रिकेट संघात रविवारी 5 ऑक्टोबर रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानी फलंदाज मुनीबा अलीच्या बाद होण्यानं वाद निर्माण झाला.
नेमकं काय घडलं :
दीप्ती शर्माच्या थ्रोनं ती धावबाद झाली. ही घटना पाकिस्तानी डावाच्या चौथ्या षटकात घडली. वेगवान गोलंदाज क्रांती गौडच्या षटकातील शेवटचा चेंडू मुनीबा अलीच्या पॅडवर लागला. भारतीय खेळाडूंनी एलबीडब्ल्यूसाठी अपील केलं, परंतु मैदानावरील पंचांनी तिला नॉट आऊट घोषित केलं. भारतीय विकेटकीपर रिचा घोषलाही चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिच झाल्याचं वाटलं, त्यामुळं भारतानं रिव्ह्यू घेतला नाही. यादरम्यान, दीप्ती शर्मानं चेंडू उचलला आणि तो थेट विकेटकीपरच्या टोकावरील स्टंपवर फेकला. मुनीबा अली क्रिजच्या बाहेर थोडी होती आणि तिनं तिचा बॅट परत क्रिजमध्ये ठेवला होता. मात्र जेव्हा बेल्स पडल्या तेव्हा तिची बॅट अजूनही जमिनीपासून थोडी वर होती. सुरुवातीला तिसऱ्या पंचांनी मुनीबाला नॉट आऊट घोषित केले, परंतु पुन्हा रिप्ले पाहिल्यानंतर त्यांनी तिला बाद ठरवलं. आता यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला आहे.
What just happened there? :open_mouth::eyes:
Appeal? Not out? But wait… Deepti Sharma's sharp instincts helped #TeamIndia get the first breakthrough! :muscle::skin-tone-2::flag-in:
Catch the LIVE action :arrow_right: https://t.co/CdmEhf3jle#CWC25 :point_right: #INDvPAK | LIVE NOW on Star Sports network & JioHotstar pic.twitter.com/TVxuoGfYC4
— Star Sports (@StarSportsIndia) October 5, 2025
आयसीसीचा नियम काय म्हणतो? :
खरं तर, तिसऱ्या पंचांचा निर्णय पूर्णपणे बरोबर होता. आयसीसी नियम पुस्तिकेत असं म्हटलं आहे की जोपर्यंत चेंडू खेळत आहे, म्हणजेच डेड नाही तोपर्यंत फलंदाजाची बॅट पॉपिंग क्रीजमध्येच राहिली पाहिजे. जर एखादा फलंदाज धावण्यासाठी धावत असेल, जरी क्रीजवर पोहोचल्यानंतर त्याची बॅट हवेत असली तरी, त्याला नॉट आऊट घोषित केलं जाईल. पण इथं, मुनीबा अली धावण्यासाठी धावत नव्हती, म्हणून थ्रोच्या वेळी तिची बॅट किंवा पाय क्रीजमध्ये असणं आवश्यक होतं, जरी तिनं आधी एकदा तिची बॅट क्रीजमध्ये ठेवली होती. मात्र जेव्हा बेल्स पडल्या तेव्हा मुनीबाची बॅट हवेत होती आणि तिचे पाय क्रीजच्या बाहेर होते. जर मुनीबा धावण्यासाठी धावत असती तर तिला नॉट आऊट घोषित केलं गेलं असतं.
आयसीसीच्या नियम 30.1 नुसार, जर एखाद्या फलंदाजाच्या शरीराचा किंवा बॅटचा कोणताही भाग पॉपिंग क्रीजच्या मागे जमिनीला स्पर्श करत नसेल, म्हणजेच बॅट किंवा पाय हवेत असेल, तर फलंदाज क्रीजच्या आत मानला जात नाही. तसंच नियम 30.1.2 मध्ये असं म्हटलं आहे की जर एखादा फलंदाज धावताना किंवा डायव्हिंग करताना क्रीजवर पोहोचला आणि एकदा त्याची बॅट किंवा शरीर क्रिजच्या आत जमिनीला स्पर्श केलं, तरीही त्यांनी त्यांचा बॅट किंवा पाय थोडा वेळ उचलला तरीही त्यांना क्रीजच्या आत मानलं जाईल.
हे हि वाचा : महिला ब्रिगेडकडूनही पाकिस्तानचा पराभव, टीम इंडियाचा शेजाऱ्यांविरुद्ध सलग 12वा विजय
पाकिस्तानी कर्णधारानं घातला वाद :
मात्र पाकिस्तानी खेळाडूंना नियमाची माहिती नव्हती. या घटनेनंतर, पाकिस्तानी कर्णधार फातिमा सना चौथ्या पंचाशी वाद घालताना दिसली, तर मुनीबा अली स्पष्टपणे निराश दिसत होती. दरम्यान, भारतीय खेळाडू आनंद साजरा करत होते. नंतर रिप्लेमध्ये असंही दिसून आले की जर भारतानं त्या चेंडूचा रिव्ह्यू घेतला असता, तर मुनीबा एलबीडब्ल्यू आउट झाली असती.