महाराष्ट्रात गणपती उत्सवाची सर्वत्र तयारी सुरु आहे. आता गणपती बाप्पा ST कर्मचाऱ्यांना पावणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ST कर्मचाऱ्यांना पुढील महिन्याचा पगार गणेशोत्सवाआधी मिळावा यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आदेश काढले आहेत. आज वित्त मंत्रालयाकडे कर्मचारी पगाराची फाईल सादर करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे.