८ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या “खालिद का शिवाजी” या मराठी चित्रपटाला हिंदू संघटनांसह शिवशंभू विचार मंच कडून तीव्र विरोध होतो आहे. चित्रपटात चुकीच्या गोष्टी दाखवल्याचा आरोप असून सेन्सॉर बोर्डाचा हलगर्जीपणाही अधोरेखित करण्यात आला. “हा चित्रपट आम्ही प्रदर्शित होऊच देणार नाही,” अशी ठाम भूमिका संघटनेकडून मांडण्यात आली असून, प्रदर्शित झाल्यास शिवप्रेमींकडून बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.