छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन रोडवर असणाऱ्या धरणात ऐन पोळ्याच्या सणाच्या दिवशी पोहण्यासाठी गेलेल्या एका तेरा वर्षीय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लासुर स्टेशन येथील जिल्हा परिषद शाळेतील शिकणारे काही विद्यार्थी हे काल पोहण्यासाठी गेले होते. मात्र या मुलाला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.