पुसद बसस्थानकाच्या परिसरात एका महिला कंडक्टरने झाडावर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. आत्महत्येच्या धक्कादायक घटनेत स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे त्या महिलेला वाचवण्यात आले. महिला कंडक्टरवर मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता त्याच मानसिक ताणामुळे हे टोकाचं पाऊल उचलायचे समोर आले. सुदैवाने, पोलिस व नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.