गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानावर मराठा नेते मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आल्या असता मराठा आंदोलकांनी त्यांना घेरले. यावेळी मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. सुप्रिया सुळे यांच्या समोर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत शरद पवारांनी आमचे वाटोळे केल्याचे सांगितले. एवढेच नाही तर सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर देखील आंदोलकांनी पाण्याच्या बाटल्या फेकल्या.