वसमत शहरात स्वानंद गणेश मंडळाच्या गणपती बाप्पांचे आगमन ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात झाले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंडळ विविध समाजोपयोगी उपक्रम आणि आकर्षक देखावे सादर करणार आहे. बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली असून वातावरणात श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण आहे.