कल्याण-डोंबिवली महापालिकेने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व कत्तलखाने 24 तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या या निर्णयावर खाटीक संघटनांनी आंदोलन केले आणि हातात कोंबड्या घेऊन गेटसमोर दाखल झाले. पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले, असून परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष बंदोबस्त तैनात केला आहे. मालेगाव महापालिकेतही सर्व मांस विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले असून नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरली आहे.