माण तालुक्यातील पळसावडे येथील टाटा पॉवर कंपनीकडून स्थानिक भूमिपुत्र कामगारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात सामाजिक कार्यकर्ते महेश करचे स्वातंत्र्यदिनापासून साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. उद्या ते दंडवत घालून जिल्हाधिकाऱ्यांकडे पुन्हा गाऱ्हाणे मांडणार असून, कामगारांची नोकरी पुनर्बहाली, वेतनवाढ, आरोग्य सुविधा व कायमस्वरूपी रोजगाराची हमी यांसह आश्वासनांची तात्काळ अंमलबजावणी ही प्रमुख मागणी आहे.