छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ येथील लेणीसमोर कुंडात बुडून विद्यार्थी चेतन पगडे आणि त्याला वाचवण्यासाठी धावलेले शिक्षक राजवर्धन वानखेडे यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, ठाण्यातील उपवन तलावात पोहण्यासाठी गेलेल्या १० वर्षीय राज चाबुकस्वार या बालकाचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.