तेलंगणा: भारत राष्ट्र समिती पक्षात मोठा वाद उफाळला आहे. पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी त्यांची मुलगी आणि आमदार के. कविता यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी केली.
वडिलांनीच पक्षातून बाहेर काढल्यानंतर के.कविता यांनी बुधवारी (3 सप्टेंबर) आमदारकीचा राजीनामा दिला.
के. चंद्रशेखर राव आणि मुलगी के. कविता यांच्यातील वाद मंगळवारी (2 सप्टेंबर) टोकाला पोहचला. के. कविता यांनी पक्षातील वरिष्ठ नेते हरिश राव आणि संतोष राव यांच्यावर गंभीर आरोप केले.
“हरिश राव आणि संतोष राव यांनी माझे वडिल आणि BRSचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव यांची प्रतिमा मलिन करण्याचा कट रचला आहे. या कटामागे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा हात आहे”,असा आरोप के.कविता यांनी केला होता.
कविता यांनी असा आरोपही केला की हरीश राव यांनी निवडणुकीरम्यान असा प्रचार केला की त्यांचे वडील केसीआर आणि केटीआर यांचा पराभव होईल
हकालपट्टीनंतर आमदारकीचा राजीनामा
के.कविता यांना मंगळवारी के.चंद्रशेखर राव यांनी पक्षातून बडतर्फ केले. त्यानंतर BRSमधील हा संघर्ष चव्हाट्यावर आला. पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर के.कविता यांनी बुधवारी (3 सप्टेंबर) विधान परिषद आमदारकीचा राजीनामा दिला.
के. कविता यानी माध्यमांना सागितले, की मी BRSचा राजीनामा देत आहे. आणि माझ्या आमदारकीचा राजीनामाही विधान परिषद सभापतींकडे सुपूर्द करत आहे.
दुर्गा चव्हाण (लेखिका)