पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जपान-चीन दौऱ्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने जोरदार टीका करत परदेशातील स्वागत फसवे असल्याचा आरोप केला आहे. सामना संपादकीयमध्ये मोदींच्या विदेश नितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनिवासी भारतीयांना भारतातील खरी परिस्थिती व लोकभावना माहित नसल्याचे म्हटले आहे. तसेच चीनच्या घुसखोरीवर मोदींनी मौन पाळल्याचाही आरोप करण्यात आला आहे.