आज ऑक्टोबर महिन्यातील पहिला दिवस असून या महिन्यात मद्यप्रेमींना ड्राय डे पाळावा लागणार आहे. कारण या महिन्यात दसऱ्याच्या दिवशीच गांधी जयंती आल्याने महिन्याच्या सुरुवातीलाच ड्राय डे असणार आहे. या दिवशी दारूची दुकाने, रेस्ट्रॉरंट मध्ये दारू मिळणार नाही. तसेच या महिन्यात येणाऱ्या ड्राय डे च्या तारखा आणि नियम जाणून घेण्यासाठी हा लेख जरूर वाचा.
2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती साजरी केली जाते. त्यानिमित्ताने देशभर ड्राय डे पाळला जातो. याच दिवशी दसरा आल्याने मद्यप्रेमींना आता या दिवशी दारूची दुकाने, बार आणि रेस्टॉरंट्समध्ये मद्य मिळणार नाही. एवढेच नाही तर ऑक्टोबर महिन्यात फक्त दसरा आणि गांधी जयंतीच नाही तर महर्षी वाल्मिकी जयंती, दिवाळी आणि छठ पूजा देखील असणार आहे. त्यामुळे या दिवशी देखील ड्राय डे असणार आहे.
या ऑक्टोबर महिन्यात असलेल्या ड्राय डे च्या दिवशी दारुची दुकाने बंद राहणार आहेत. यासह बार सुद्धा बंद असणार आहेत. एवढंच नाही तर रेस्ट्रॉरंट आणि बारमध्येही मद्य विक्री करण्यात येणार नाही. याठिकाणी फक्त जेवणाचे पदार्थ सर्व्ह करण्यात येतील. ड्राय डे च्या दिवशी नियमांचं उल्लंघन करणाऱ्यावर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून कारवाई करण्यात येणार आहे.
राज्यनिहाय ड्राय डेची अंमलबजावणी
भारतात ड्राय डेची अंमलबजावणी राज्यनिहाय करण्यात येते. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या सण-उत्सवांनुसार ड्राय डे चे दिवस निश्चित करण्यात आले आहेत. मुख्यतः 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबरसारख्या राष्ट्रीय दिनी सर्व राज्यांमध्ये मद्य विक्रीवर बंदी घालण्यात येते. यासह सणासुदीच्या काळात देखील बंदी घालण्यात येते.
या दिवशी राहणार ड्राय डे
महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात गांधी जयंतीच्या दिवशी यावर्षी दसरा आल्यामुळे कोणत्याही दुकानात दारू मिळणार नाही. तसेच 7 ऑक्टोबर ला महर्षी वाल्मिकी जयंतीच्या दिवशी देखील दारू विक्री बंद असणार आहे. एवढंच नाही तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात दारूची दुकाने बंद राहणार आहेत. कारण महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये दारूबंदी सप्ताह पाळण्यात येतो.
या महिन्यात 21 ऑक्टोबर रोजी दिवाळी आहे. यामुळे यादिवशी देखील देशाच्या बहुतेक भागात दारूची दुकाने बंद राहतील. याच महिन्यात 28 ऑक्टोबर रोजी देशाच्या अनेक भागात छठ पूजा साजरी केली जाते. त्यामुळे या दिवशी देखील दारू बंदी करण्यात आली आहे. यासह काही भागात 26, 27, आणि 28 या तिन्हीही दिवशी दुकाने बंद राहतील. यामुळे तळीरामांना ऑक्टोबरच्या महिन्यात बरेच दिवस ड्राय डे पाळावा लागेल.