Zohra Mamdani New York Mayor : मूळ भारतीय वंशाचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जोहरान ममदानी यांनी बुधवारी न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या शर्यतीत ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांनी निवडणुकीत अपक्ष उमेदवार अँड्र्यू कुओमो यांचा पराभव केला. या विजयासह, ममदानी शहराचे पहिले भारतीय वंशाचे महापौर आणि अमेरिकेतील सर्वात मोठ्या महानगराचं नेतृत्व करणाऱ्या सर्वात प्रमुख पुरोगामी व्यक्तींपैकी एक बनले आहेत.
कधी स्विकारणार कार्यभार :
न्यूयॉर्क शहराच्या महापौर पदाच्या निवडणुकीतील विजयानंतर जोहरान ममदानी यांनी एक्स मीडियात पोस्ट केली आहे. ममदानी यांनी सिटी हॉलमध्ये न्यूयॉर्क सबवे ट्रेन सुरू होत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला. भिंतीवर झोहरान फॉर न्यूयॉर्क सिटी असे लिहिलं आहे. सिटी हॉल हे महापौरांचे कार्यालय असलेलं ठिकाण आहे. जोहरान ममदानी 1 जानेवारी 2026 रोजी न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
Just spoke to Mayor-Elect @ZohranKMamdani and told him I’m looking forward to working together to make our city more affordable and livable.
Congratulations to him and to every New Yorker who made their voice heard in one of the city’s highest-turnout elections on record. pic.twitter.com/dhRFA0RcMn
— Governor Kathy Hochul (@GovKathyHochul) November 5, 2025
ट्रम्प यांचा निधीत कपात करण्याचा इशारा :
जूनमध्ये झालेल्या डेमोक्रॅटिक प्रायमरीमध्ये माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो यांना पराभूत केल्यानंतर ममदानी यांनी दुसऱ्यांदा त्यांचा पराभव केला. भाडे दर नियंत्रणासाठी उपाय योजना, परवडणारी बस सेवा, मोफत बालसंगोपन आणि अतिश्रीमंतांवरील करवाढ अशी ममदानी यांनी आश्वासने निवडणुकीत दिली होती. या निवडणुकीपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जोहरान ममदानी यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. जर कम्युनिस्ट उमेदवार जोहरान ममदानी न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झाले, तर शहरासाठी कमी निधी देणार असल्याचा ट्रम्प यांनी इशारा दिला होता.
कोण आहेत ममदानी (Zohra Mamdani New York Mayor)
18 ऑक्टोबर 1991 रोजी युगांडातील कंपाला इथं जन्मलेले जोहरान क्वामे ममदानी हे युगांडाचे महमूद ममदानी आणि प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्मात्या मीरा नायर यांचे पुत्र आहेत. त्यांचे बालपण त्यांना युगांडापासून दक्षिण आफ्रिका आणि न्यूयॉर्क शहरात गेलं आहे. त्यांनी 2014 मध्ये बोडोइन कॉलेजमधून आफ्रिकाना स्टडीजमध्ये पदवी मिळवण्यापूर्वी बँक स्ट्रीट स्कूल फॉर चिल्ड्रन आणि ब्रॉन्क्स हायस्कूल ऑफ सायन्समध्ये शिक्षण घेतले. 2017 मध्ये अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक सोशलिस्ट्समध्ये सामील होऊन त्यांनी 2020 मध्ये न्यूयॉर्क राज्य असेंब्लीची निवडणूक जिंकली होती.







