सोलापूर काँग्रेसतर्फे खा. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली “मतदान चोर, खुर्ची सोड” या घोषणांसह मशाल रॅली काढण्यात आली. बलिदान चौक ते चार हुतात्मा चौकापर्यंत झालेल्या या रॅलीत कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती दिसून आली. यावेळी शिंदेंनी “देश लोकशाहीच्या धोक्यात आहे, मतदानाचा हक्क चोरला जातोय, हीच खरी दुसरी स्वातंत्र्यलढाई आहे” असे सांगत जनतेला जागरूक राहण्याचे आवाहन केले.