हिमायतनगर रेल्वेस्थानकात धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केलेल्या युवकाचा मृतदेह इंजिनला अडकला. ६ ऑगस्टला इस्लापूर ते हिमायतनगर मार्गावर घडलेली ही घटना, १८ किलोमीटर अंतरात रेल्वेने मृतदेह फरफटत नेला. युवकाचे नाव शाहिराज पांडुरंग लोलेपवाड असून तो आई-वडिलांचे एकमेव अपत्य होता. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.