मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्ट रोजी मराठा समाज मुंबई कडे मार्गस्थ होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातून देखील लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईला जाण्यासाठी तयारीला लागला. मुंबई करांना त्रास देण्यासाठी नाही तर आमच्या हक्काच्या लढाई साठी जात आहोत असं धाराशिव येथील मराठा आंदोलकांनी सांगितलं आहे. याच तयारीचा आढावा घेण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव पारवे यांनी