अलास्कामध्ये झालेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या बैठकीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले. रशियन तेलपुरवठ्यावर निर्बंध शिथिल होण्याच्या संकेतामुळे ब्रेंट क्रूड सुमारे 26 ते 32 सेंटने घसरून प्रति बॅरल 65 डॉलर्सवर, तर डब्ल्यूटीआय 18 ते 23 सेंटने घसरून 62 डॉलर्सवर आला.