श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत मंदिरातील विविध कामे सुरू असून मंदिर जतन आणि दुरुस्तीची कामे सुरू आहेत. केंद्रीय पुरातत्व विभाग राज्य पुरातत्व विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांनी चर्चा करून त्रस्त एजन्सीज कडून तज्ञांची मदत घेऊन पुढील 30 दिवसात अहवाल सादर करावेत असे आदेश सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी आज दिले आहेत. गाभारा व शिखर याबाबत आज मंत्रालयात सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या दालनात आमदार राणा जगजितसिंह पाटील मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार तिन्ही पुजारी मंडळाचे अध्यक्ष महंत यांची बैठक संपन्न झाली यावेळी मंदिर दुरुस्ती व जतन यावर चर्चा झाली.