घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील ज्ञानेश्वरी ज्वेलर्स मधून तब्बल 19 लाख 76 हजार रुपयांचे दागिने लंपास करणारे फरार आरोपी किशोरसिंग टाक व गजानन बर्डे यांना पोलिसांनी राजुर चौफुली येथे ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून ६४ हजार ८९२ रुपयांचा चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याआधी या प्रकरणात शक्तिमान टाकला अटक झाली होती. पोलिस चौकशीत आरोपींनी घरफोडीचे पाच व डिझेल चोरीचे दोन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.