साताऱ्यातील छत्रपती दहीहंडी महोत्सवात खासदार उदयनराजे भोसले यांच्या एन्ट्रीनं उत्साहाचा शिगेला पोहोचला. आकाशात फटाक्यांची आतषबाजी, कॉलर उडवत फ्लाईंग किस आणि “वाजवा रे…” म्हणत उदयनराजेंनी तरुणाईला डीजेच्या तालावर नाचायला प्रोत्साहित केले. तासगावच्या शिवनेरी गोविंदा पथकानं सात थर लावत तब्बल ₹4,44,444 चे बक्षीस पटकावले.