शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि देशाच्या राजकीय परिस्थितीवर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. बिहारमधील मतदार याद्यांच्या घोळावरून उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले, तसेच शिंदे गटाला ‘गद्दार’ म्हणत भाजप आणि शिंदे गटावर गंभीर आरोप केले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावरही टीका केली.