अमेरिकेने आयात केलेल्या वस्तूंवर लावलेल्या ‘टॅरिफ’मुळे गुजरातला मोठा आर्थिक फटका बसला आहे. विशेषतः डायमंड मार्केटमध्ये याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या टॅरिफमुळे जवळपास एक लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या या धोरणामुळे भारताच्या निर्यात क्षेत्राला मोठा धक्का बसला असून, त्याचे परिणाम आता ठळकपणे दिसून येत आहेत.