पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या बीडच्या परळी येथील वैद्यनाथ मंदिरात पाऊस पडत असतानाही भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत. मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला असून, आज चौथा आणि शेवटचा श्रावण सोमवार असल्याने भाविकांची मोठी रेलचेल दिसून आली. या ज्योतिर्लिंग ठिकाणी स्पर्श दर्शनाचे महत्त्व असल्याने भाविक विविध राज्यांतून दाखल होत असतात. विशेष म्हणजे, रात्रीपासून सुरू असलेल्या पावसातही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. भाविकांकडून शिवनामाचा जयघोष घुमत आहे.