छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी मोठी कारवाई केली आहे. गंगापूरकडून वैजापूरमार्गे कोपरगावकडे जाणारे आयशर टेम्पो पोलिसांनी थांबवलं. या आयशर टेम्पोमध्ये तब्बल ६३ लाखांच्या गुटख्यासह एकूण 83 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.