वैष्णोदेवी मार्गावरील अधक्वारीजवळील इंद्रप्रस्थ भोजनालय परिसरात मंगळवारी दुपारी झालेल्या भूस्खलनात किमान 30 भाविकांचा मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे झालेले हे भूस्खलन आणि पुरामुळे यात्रा तात्काळ स्थगित करण्यात आली असून रेल्वेसह वाहतूक सेवाही विस्कळीत झाली आहे. NDRF, CRPF आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले