जावळी तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नव्याने निवडलेले प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नागरी सत्काराच्या दिवशी भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शशिकांत शिंदे यांना वसंतराव मानकुमरे यांनी सल्ला दिला आहे की, “मी माथाडी क्षेत्रात सिनिअर आहे, त्यांनी मला शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न करू नये.” तसेच, वसंतराव मानकुमरे यांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली जावळी तालुक्यातील उमेदवार निवडून आणणार असल्याचे स्पष्ट केले.