Rohit Arya encounter : मुंबईतील पवई भागात रोहित आर्या नामक व्यक्तीनं ऑडिशनसाठी आलेल्या काही लहान मुलांना ओलीस ठेवले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ माजली. यानंतर विशेष बचाव मोहीम सुरू करून सर्व मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली. मात्र सुटका करताना रोहित आर्या आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. यावेळी रोहितने पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी देखील गोळीबार केला आणि त्यात रोहित आर्या जखमी झाला. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. मुलांना ओलीस ठेवल्यानंतर आर्याने एक व्हिडीओ केला होता. बघूया त्याचं नक्की काय म्हणणं होतं. सोबतच पोलिसांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मी काही दहशतवादी नाही. मात्र माझ्या मागण्या ऐका. नाहीतर मी या संपूर्ण जागेला आग लावेन. यात मुलांना काही झालं तर तुम्ही याला जिम्मेदार असाल असा इशारा त्याने व्हिडीओ मध्ये दिला होता. त्यामुळे पोलीस आणि आर्याची चकमक अटळ होती. सुटका केलेल्या मुलांना रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे (Rohit Arya encounter)






