राज्यभरात पावसाचा जोर वाढतांना दिसतो आहे. अशातच पावसाळ्यात ग्रामीण भागात रस्ते नसल्याने अनेक ठिकाणी गावकऱ्यांना प्रचंड समस्यांना सामोरे जाव लागत आहे. असाच काहीसा प्रकार परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील टाकळवाडी गावातून समोर आला आहे. अवघ्या दीड किलोमीटरपर्यंतचा रस्ता खराब असल्याने गावकऱ्यांना प्रचंड त्रासाला समोर जावं लागतं आहे. परिणामी, चिखलमय रस्त्यात अर्धनग्न होत गावकऱ्यांनी डबक्यात लोटांगण घालून अनोख्या पद्धतीने आंदोलन सुरु केलं आहे.