बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील वरपगावचे सतीश देशमुख यांचा मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मोर्चादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे. ग्रामस्थांनी केज येथील तहसीलदारांना निवेदन देत ठाम भूमिका घेतली असून, देशमुख यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत नोकरी मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार करण्यात येणार नाहीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.