काल रात्रीच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या देवभाने फाट्याजवळ शिरपूर कडून धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. ट्रक मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचे बोलले जात आहे. वाहन चालकाच्या वेळीच लक्षात येता त्याने गाडीतून उडी घेत आपला जीव वाचवला, यानंतर गहूने भरलेला कंटेनरची संपूर्ण कॅबिन पूर्णपणे जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच धुळे मनपाच्या अग्निशामक दलाच्या माध्यमातून ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले.