हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील भेंडेगाव शिवारात पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला. पती अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने ही घटना घडल्याचे समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा व कुरुंदा पोलिसांनी अवघ्या चार तासांत खुनाचा तपास उघडकीस आणत पत्नी व प्रियकराला ताब्यात घेतले. मृताचे नाव शिवाजी पोटे असून आरोपी महिला व तिचा प्रियकर ज्ञानेश्वर ठोंबरे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.