गेल्या चार वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींचा हैदोस सुरू आहे. या हत्तींनी कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी आणि चामोर्शी तालुक्यात धुडगूस घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.सध्या रानटी हत्ती गडचिरोली वन विभागाच्या हद्दीत असून दिवसा जंगलात आणि रात्री गावांत प्रवेश करून धान पिकासह, इतर साहित्य आणि घरांचे नासधूस करत असल्याने नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. वन विभागाचे पथक टस्कर हत्तींचा मागोवा घेत असले तरी या परिसरात रानटी हत्तींची मोठी दहशत निर्माण झाली आहे.विविध गावातील नागरिकांना रात्रभर जागे राहून फटाक्यांचा आवाज करत हत्तींना हाकलून लावायची वेळ आली आहे.