मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आणि हजारो मराठा बांधवांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितले की, “आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही” आणि सातारा–हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी होईपर्यंत ते तिथेच राहतील. या संबधित मुंबई उच्च न्यायालयात आज दुपारी पुन्हा सुनावणी होणार आहे.