गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील लक्ष्मी रोडवर खरेदीसाठी झालेल्या गर्दीत अचानक एक बस चालकाला हृदयविकाराचा झटका आला. ही घटना बेलबाग चौकात घडली. तेव्हा वाहतूक नियमन करत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल रोमेश ढावरे आणि महिला पोलीस अर्चना निमगिरे यांनी तत्परता दाखवत बसमध्ये धाव घेतली. त्यांनी चालकाला बाहेर काढून सीपीआर देत त्याचे प्राण वाचवले. रुग्णवाहिका येण्याची वाट न पाहता त्यांनी स्थानिक रिक्षाचालकाच्या मदतीने चालकाला तातडीने पुणे हॉस्पिटलमध्ये दाखल केले.