शेगाव शहरातील प्रभाग क्रमांक 14 मधील तीन पुतळा परिसर, इंदिरानगर, मिलिंद नगर, भीम नगर, दसरा नगर या भागामध्ये अवैध दारू विक्री सह अवैध व्यवसाय बोकाळले असून ते तात्काळ बंद करण्यात यावे या मागणीसाठी आज शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये या भागातील नागरिकांनी धडक दिली. यावेळी पोलीस स्टेशनला ठाण मांडून कारवाईची मागणी करण्यात आली..