plane crash in America: अमेरिकेतील लुईसविले मुहम्मद अली आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच एक UPS मालवाहू विमान कोसळलं. UPS ही एक पार्सल कंपनी आहे. हे विमान हवाईला जात होतं. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) नुसार, UPS MD-11 विमान उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच कोसळलं. FAA नं सांगितलं की, राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ (NTSB) या अपघाताची चौकशी करत आहे.
परिसरात धुराचे मोठे लोट :
विमान जमिनीवर आदळताच मोठी आग लागली. अपघातानंतर अधिकाऱ्यांनी हवाई क्षेत्र बंद केलं आणि रहिवाशांना बाहेर काढण्याचे आदेश दिले. UPS ने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की विमानात तीन क्रू मेंबर्स होते. लुईसविले मेट्रो पोलीस आणि इतर अनेक एजन्सी घटनास्थळी पोहोचल्या. सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये विमानतळाजवळ काळ्या धुराचे मोठे लोट उठताना दिसत होते.
हे हि वाचा : इस्रो’ने इतिहास रचला! ‘बाहुबली’ मधून सर्वात वजनदार उपग्रहाची अवकाशात उडाण..
परिस्थिती धोकादायक :
केंटकीचे गव्हर्नर अँडी बेशियर यांनी सांगितलं की विमान अपघातात किमान तीन लोक ठार झाले आणि 11 जण जखमी झाले. आम्ही सर्व केंटकी रहिवाशांना प्रभावित झालेल्यांसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन करत आहोत. बेशियर म्हणाले की अपघातानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचा प्रतिसाद कौतुकास्पद होता. विविध ज्वलनशील आणि संभाव्य स्फोटक पदार्थांच्या उपस्थितीमुळं ही एक धोकादायक परिस्थिती आहे.
‼️🇺🇸🔥Harrowing footage of a cargo plane crash in the US
▪️A McDonnell Douglas MD-11F operated by UPS exploded during takeoff from the airport in Louisville, Kentucky.
▪️After the crash, a powerful explosion and a large plume of black smoke rose short of the runway at Muhammed… pic.twitter.com/XwQMdAj8Vl
— Bernadette 🏴🇮🇪🇷🇺🇵🇸 (@BDooher) November 4, 2025
हजारो लोक करतात काम :
लुईसविले मुहम्मद अली आंतरराष्ट्रीय विमानतळ हे यूपीएससाठी जगातील सर्वात मोठं केंद्र आहे. कंपनीचे वर्ल्डपोर्ट इथं स्थित आहे, जे 5 दशलक्ष चौरस फूट पसरलेले आहे. 12000 हून अधिक कर्मचारी या भव्य सुविधेत दररोज अंदाजे 20 लाख पार्सल प्रक्रिया करतात. म्हणूनच ही दुर्घटना यूपीएससाठी एक मोठी चिंतेची बाब बनली आहे.
विमानाबद्दल जाणून घ्या :
माहितीनुसार, अपघातग्रस्त विमान एमडी-11एफ मॉडेलचे होते, जे मूळतः मॅकडोनेल डग्लसनं बनवलं होतं आणि नंतर बोईंगनं ताब्यात घेतलं. हे विमान प्रामुख्यानं कार्गोसाठी वापरलं जातं आणि यूपीएस, फेडेक्स आणि लुफ्थांसा कार्गो सारख्या कंपन्यांद्वारे ते उडवलं जातं. अपघातग्रस्त विमान 1991 मध्ये तयार केलं गेलं होतं. (plane crash in America)












