यवत गावात गेल्या ४ दिवसांपासून लागू असलेल्या जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर आज ५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते ११ या वेळेत जिल्हाधिकाऱ्यांनी बंदीत सैलसर केली आहे. त्यामुळे सकाळी यवतची बाजारपेठ पुन्हा एकदा उघडताना दिसली, आणि नागरिकांनी आवश्यक खरेदीसाठी गर्दी केली. चार दिवसांच्या शांततेनंतर शहरात हालचाल दिसून आली. मात्र सकाळी ११ नंतर पुन्हा जमावबंदीचे आदेश लागू राहणार आहेत. पोलिस प्रशासन सतर्क असून, नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुकानदारांनीही आदेशांचे पालन करत व्यवसाय सुरू केला असून, गावात अंशतः पूर्वस्थिती येण्यास सुरुवात झाली आहे.(i/p Byte )