मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा मृतदेह सापडल्याची घटना घडली आहे. शिवाय या तरुणीच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणा देखील दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच कफ परेड पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील तपास सुरु केला आहे.