दारूच्या अति सेवनामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याच्या संतापातून मुलाने नागपूरमध्ये बार आणि वाईन शॉपमध्ये चोरी केली. राजा खान असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने ८ दुकाने लुटली होती. 31 जुलै रोजी मयुरी सावजी बारमध्ये चोरी करून 40 हजारांचा ऐवज चोरला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला पकडले आणि त्याने अन्य चोरींचे कबूल केले.